Ladki Bahin Yojana लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांच्या खात्यात चार हफ्त्यांचे पैसे जमा झाल्याचं सरकारकडून सांगण्यात येतंय. पाचव्या आणि सहाव्या हफ्त्याचे पैसे लवकरच जमा केले जातील, असं आश्वासनही राज्य सरकारकडून दिलं जात आहे.अशातच आता लाडकी बहिण योजनेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे,
योजनेच्या माध्यमातून महिलांना मोफत मोबाईल फोन मिळणार आहे, असे मेसेज सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत. लाडकी बहीण योजना मोबाईल गिफ्ट (ladki Bahin Yojana Mobile Gift) अशा आशयाचे पोस्ट इंटरनेटवर व्हायरल झाले आहेत. पण या व्हायरल पोस्टमागे नेमकं काय सत्य आहे? याबाबत आम्ही तुम्हाला सविस्तर माहिती सांगणार आहोत.
Ladki Bahin Yojana मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लाडकी बहीण योजना राज्यात सुरु करण्यात आली आहे. या योजनेसाठी पात्र ठरणाऱ्या महिलांना दरमहा 1500 रुपये देण्याची तरतूद करण्यात आली आहे. परंतु, आता महिलांना या योजनेच्या माध्यमातून मोबाईल फोन मोफत देणार असल्याची चर्चा सुरु आहे. लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना मोबाईल फोने गिफ्ट देणार असल्याचे व्हिडीओ समोर आले आहेत.
Ladki Bahin Yojana फ्री मोबाईलच्या ऑफरबाबत नेमकं सत्य काय?
Ladki Bahin Yojana महिलांनी मोबाईलसाठी अर्ज करावे लागतील, असंही सांगण्यात येतंय. त्यामुळे राज्यातील लाखो महिला या मोबाईल स्कॅमला बळी पडू शकतात. गेल्या काही महिन्यांमध्ये लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून भ्रष्टाचार होत असल्याचा आरोपही करण्यात येत आहे. डमी अर्ज भरून या योजनेचे पैसे हडप करण्याचा प्रकारही काही ठिकाणी घडल्याचं समोर आलंय. अशातच आता मोबाईल स्कॅमचे मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याने, महिलांचा पुरता गोंधळ उडाल्याचं पाहायला मिळत आहे.