Gold Rates Today दिवाळीत उच्चांकीवर असलेले सोन्याचे दर आता झपाट्याने खाली येत आहे. ही दरातील घसरण बघता येत्या काही दिवसांत सोन्याचे दर ७० हजार रुपये प्रति दहा ग्रामपर्यंत खाली येणार का? हा प्रश्न ग्राहकांना पडला आहे. परंतु या विषयावर सराफा व्यवसायिकांचे वेगळे मत आहे.
नागपुरात यंदाच्या धनत्रयोदशीला (२९ ऑक्टोबर) बाजार उघडल्यावर सोन्याचे दर २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम ७९ हजार २०० रुपये, २२ कॅरेटसाठी ७३ हजार ७०० रुपये, १८ कॅरेटसाठी ६१ हजार ८०० रुपये, १४ कॅरेटसाठी ५१ हजार ५०० रुपये नोंदवले गेले. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी (१ नोव्हेंबर) हे दर आणखी वाढून २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम ७९ हजार ४०० रुपयेपर्यंत गेले. त्यानंतर दरात सतत घसरण होत आहे.Gold Rates Today
Gold Rates Today नागपुरात ६ नोव्हेंबरला बाजार उघडल्यावर सोन्याचे दर २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम ७९ हजार रुपये, २२ कॅरेटसाठी ७३ हजार ५०० रुपये, १८ कॅरेटसाठी ६१ हजार ६०० रुपये, १४ कॅरेटसाठी ५१ हजार ४०० रुपये होते. हे दर गुरूवारी (१४ नोव्हेंबर) २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम ७४ हजार ५०० रुपये, २२ कॅरेटसाठी ६९ हजार ३०० रुपये, १८ कॅरेटसाठी ५८ हजार १०० रुपये, १४ कॅरेटसाठी ४८ हजार ४०० रुपये नोंदवले गेले. त्यामुळे सोन्याच्या दरात ६ नोव्हेंबरच्या तुलनेत १४ नोव्हेंबरला २४ कॅरेटमध्ये ४,५०० रुपये, २२ कॅरेटमध्ये ४,२०० रुपये, १८ कॅरेटमध्ये ३,५०० रुपये, १४ कॅरेटमध्ये ३ हजार रुपये प्रति दहा ग्राम घट झाली आहे. ही घट बघता येत्या काळात हे दर २४ कॅरेटमध्ये ७० हजार रुपये प्रति दहा ग्रामपर्यंत खाली येणार काय? हा प्रश्न ग्राहकांना पडला आहे. परंतु सराफा व्यवसायिकांचे वेगळे मत आहे. सराफा व्यवसायिकांच्या मते सध्या सोन्याचे दर घटल्याने ग्राहकांना दागिने खरेदीची चांगली संधी आहे. परंतु येत्या काळात हे दर चांगलेच वाढण्याचा अंदाजही सराफा व्यवसायिक वर्तवत आहे
चांदीच्या दरातही मोठी घसरण
नागपुरातील सराफा बाजारात धनत्रयोदशीच्या दिवशी २९ ऑक्टोंबरला प्रति किलो चांदीचे दर ९८ हजार ८०० रुपये होते. हे दर ६ नोव्हेंबरला ९४ हजार ३०० रुपये प्रति किलो होते. तर १४ नोव्हेंबरला ८९ हजार रुपये प्रति किलो नोंदवले गेले. त्यामुळे चांदीच्या दरात ६ नोव्हेंबरच्या तुलनेत १४ नोव्हेंबरला तब्बल ५ हजार ३०० रुपयांची घट झाली.Gold Rates Today